February 20, 2019
    

मी सुरेश कृष्णराव  राजोपाध्ये , माझ्या पत्नीच्या दोनही गुढग्याचे ऑपरेशन करण्यासाठी दि.  २२. १.१९ रोजी श्री डॉ. श्रीरंग लिमये ह्यांच्या दवाखान्यात दाखल केले. पहिल्या भेटीतच ऑपरेशन करण्याआधी सर्व श्री. श्रीरंग लिमये ह्यांच्याशी संभाषण झाले . ह्या भेटीतच डॉ. यांचा शांत स्वभाव ; माणुसकी व पेशंट बद्दल असलेली आपुलकी: ह्यांचे दर्शन झाले त्यांच्या बोलण्याने मनात असलेली भिती पार निघून गेली. त्यांच्या रूपाने  परमेश्वर आम्हास भेटले असे वाटले त्याच वेळी माझ्या पत्नीने व मी ह्याच डॉक्टरांच्या कडे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला .

दि. २२. १. ते ३१. १. २०१९ पर्यंत आम्हास आलेले प्रत्यक्ष अनुभव थोडक्यात खाली देत आहे .
१. स्वतः डॉ. श्रीरंग लिमये सर अतिशय मन मिळावू तज्ञ माणुसकी असलेली व्यक्ती आहे त्याचे कौतुक करावयास मला शब्दच सुचत नाहीत.
२. देवयानी सारखा सर्व आधुनिक सोईनी सुसह्य असलेला दवाखाना ह्या संपूर्ण परिसरात आहे हेच आमच्या सारख्यांचे भाग्यच आहे असे मला वाटते.
३. ह्या दवाखान्यातील गेट पासून ते संपूर्ण मजल्यानं वरील स्वच्छता १०० सुंदर आहे
४. डॉ. लिमये ह्यांच्या अधिकच्या खाली असलेला संपूर्ण  डॉक्टर्स नर्स अकाऊंट स्टाफ रिसेप्शनिस्ट वगैरे संपूर्ण स्टाफची वागणूक अतिशय विनम्र व तत्पर आहे . त्यामुळे पेशंटला घरीच असल्यासारखे वाटते .
मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ह्या दवाखान्यात कोणीही पैसे भरण्याचा विषय सुद्धा काढला नाही.
आणि पैसे भरण्यास व लगेच पोच पावती मिळण्यास  १ मिनिट पेक्षा कमी वेळ लागला तो हे अतिशय चांगले वाटले थोडक्यात सांगायचे झाले तर माझ्यामते डॉ.श्रीरंगराव लिमये ह्यांचा देवयानी हा दवाखाना सर्व पुणे शहरात सर्व दृष्टीने नंबर १ आहे लिहताना माझा हात थरथरतो .काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आज दि.३१. १. १९ घरी जात आहोत ते दोघे आपणा सर्वांचे आभारी आहोत.

आपला
सुरेश कृष्णराव राजोपाध्ये
सौ. प्रमिला सुरेश राजोपाध्ये